By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 05, 2019 12:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
सरकारी अधिकारी सुरक्षित नसून त्यांचा जीवाला किती धोका आहे याचा प्रत्यय देणारी घटना तेलंगणामध्ये घडलीय. जमिनीच्या वादातून शेतकऱ्याने महिला तहसीलदाराला जाळले.
तेलंगणाच्या रंगरेड्डी जिल्ह्यातील अब्दुल्लापूरमेट विभागाच्या तहसीलदार विजया रेड्डी यांच्यावर सोमवारी दुपारी शेतकऱ्याने हल्ला केला. या हल्ल्याच्या वेळी त्या आपल्या चेंबरमध्ये होत्या. अब्दुल्लापूरमेट विभागाच्या गोरेल्ली गावात राहणारा सुरेश नावाचा शेतकरी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत तहसील कार्यालयात आला.
तहसीलदार चेंबरमध्ये शिरुन त्याने विजया रेड्डी यांच्या अंगावर पेट्रोल उडवून पेटवलं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेत आरोपी सुरेशसह तहसीलदार विजया रेड्डी यांचा चालक आणि अन्य एक व्यक्तीही भाजली आहे. जखमींना हयातनगर येथील एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. जमिनीच्या वादातून ही भयानक घटना घडलीय.
वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात विजय सिंग या संशयिताच्या कोठडीतल्या मृत्�....
अधिक वाचा