ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रुग्णालयातून घरी जात असलेल्या महिला डॉक्टराची हत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 29, 2019 02:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रुग्णालयातून घरी जात असलेल्या महिला  डॉक्टराची  हत्या

शहर : देश

रंगा रेड्डी जिल्ह्यातील शादनगरपासून अंदाजे 30 किमी दूर एका पुलाखाली गुरुवारी एक तरुणीचा जळालेला मृतदेह आढळला. बुधवारी संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या 26 वर्षीय पशुचिकित्सक डॉ.प्रियंका यांचा तो मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात जाळून हत्या झाल्याचे समोर आले आहे. प्रियंकाच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार प्रियंका  पशुरुग्णालयातून शादनगरमध्ये असलेल्या आपल्या घराकडे जात होती.

प्रियंकाने बुधवारी रात्री अंदाजे 9.15 वाजता आपल्या बहिणीला शेवटचा फोन केला होता. तक्रारीत प्रियंकाच्या बहिणीने सांगितले की, डॉ.प्रियंकाची गाडी रस्त्यात पंक्टर झाली होती. फोनवर डॉ.प्रियंका खूप घाबरलेली वाटत होती आणि आसपास खूप ट्रक आणि काही अज्ञात लोक उभे असल्याचे तिने सांगितले होते. मी तिला गाडी सोडून टॅक्सीने घरी येण्यास सांगितले. काही वेळेनंतर प्रियंकाचा फोन बंद आला. खूप शोधल्यानंतर तिचा पत्ता लागला नाही, त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली." या घटनेमुळे डॉ.प्रियंकाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.

मागे

 भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिराच्या दानपेटीची चोरी
भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिराच्या दानपेटीची चोरी

अखंड हिंदुस्तानातील पहिला सार्वजनिक गणपती अशी ख्याति असलेल्या भाऊसाहेब र....

अधिक वाचा

पुढे  

शारदा चिट फंड घोटाळा: अटकपूर्व जामिनाविरूद्ध CBI याचिकेवर राजीव कुमार यांना SC ची नोटीस
शारदा चिट फंड घोटाळा: अटकपूर्व जामिनाविरूद्ध CBI याचिकेवर राजीव कुमार यांना SC ची नोटीस

कोर्टाच्या कोर्टाचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार यांनी, कोर्टाच्या उच्च न....

Read more