By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 04:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
कोल्हापूर - फ्लॅटची बनावट कागदपत्रे सादर करून दाभोळकर कॉर्नर येथील जी.आय.सी. फायनान्स कंपनीची ११ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत कंपनीचे शाखा व्यवस्थापक अमित विलास देसाई (वय ४०, रा. कराड, जि. सातारा) यांनी बुधवारी (ता. २५) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी बिल्डर, फ्लॅटधारक, फायनान्स कंपनीतील तत्कालीन शाखा व्यवस्थापक, व्हॅल्युएटरसह ५१ जणांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहर आणि परिसरातील काही बांधकाम व्यावसायिकांनी २०१५ ते २०१७ या कालावधीत जी.आय.सी. फायनान्स कंपनीकडे बांधकामांसाठी कर्जाची मागणी केली. दाभोळकर कॉर्नर येथील शाखेतील कंपनीचे तत्कालीन शाखा प्रमुख मिनू मोहन या महिलेने बांधकाम व्यावसायिक, फ्लॅटधारक, कंपनीतील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांवर कर्ज मंजूर केले.
कर्जाचे वितरण झाल्यानंतर कालांतराने कर्जदारांकडून परतफेडीचे हप्ते थकले. दरम्यान, शाखा व्यवस्थापक मिनू मोहन यांची बदली झाली. या जागेवर आलेले नवीन शाखा व्यवस्थापक अमित देसाई यांनी थकीत कर्जदारांची माहिती घेण्याचे काम सुरू केले. कराडसह परिसरातील कर्जदारांकडूनच मोठ्या प्रमाणात कर्जाचे हप्ते थकीत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी कर्ज प्रकरणांची तपासणी सुरू केली. या तपासणीत फसवणुकीचा प्रकार समोर आला.
दिल्लीमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका अल्पव....
अधिक वाचा