By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 20, 2019 01:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात सोमवारी सकाळी एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या भररस्त्यात झालेल्या या गोळीबारामुळे घाटकोपरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, घाटकोपर स्थानकापासून काही अंतरावरच असलेल्या सर्वोदय रुग्णालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. हत्या झालेल्या व्यक्तीचे नवा बबलू दुबे आहे.यावेळी रिक्षेतून आलेल्या तीन जणांनी बबलू दुबे यांच्यावर गोळीबार केला. या तिघांनीही तोंडावर मास्क घातले असल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही. गोळीबार करून हे तिघेही फरार झाले. यानंतर बबलू दुबे यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरु आहे.
अंधेरीतील एका कार्यालयातील महिलांच्या चेंजीग रुममध्ये मोबाईल कॅमेरा लावू....
अधिक वाचा