By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 28, 2019 02:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
नाशिक शहराजवळच्या आडगावमध्ये एका सराफा दुकानावर 6 दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस घटनास्थळी वेळेवर दाखल झाले आणि दरोडेखोर आणि पोलीस यांच्यात जोरदार चकमक झाली. पोलिस आल्याचे पाहताच दरोडेखोरांनी इंडिका कारमधून पळ काढला. पोलिसांनी देखील दरोडोखोरांचा पाठलाग केला. पोलिस मागावर असल्याचे समजताच एका दरोडेखोराने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला. तर चौघांना पकडण्यात यश आले आहे. यावर पोलिसांनी दिलेल्या प्रतिउत्तरात एक दरोडेखोर जखमी झाला.
नांदेड : अर्धापूर तालुक्यातील पाटनूर येथील देशमुख कुटुंबियावर काळाने घा....
अधिक वाचा