By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: नोव्हेंबर 08, 2019 11:27 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : pandharpur
कर्नाटकातील बेळगावजवळील मंडोळी आणि हंगिर्गे गावातील अकरा वारकरी टेम्पोने पंढरपूरकडे निघाले होते. पहाटेच्या सुमारास पंढरपूर-सांगोला रस्त्यावरील मांजरी गावाजवळ विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने टेम्पोला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती यामध्ये पाच वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या पाच वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू. टेम्पो आणि ट्रॅक्टरच्या धडकेत बेळगावच्या पाच वारकऱ्यांचा मृत्यू झाला. सांगोल्याजवळील मांजरी भागात टेम्पो आणि विटाने भरलेल्या ट्रॅक्टरला भीषण अपघात झाला.
कृष्णा वामन कनबरकर, महादेव कनबरकर, यल्लापा देवाप्पा पाटील, अरुण दतात्रेय मुतकेकर, लक्ष्मण आंबेवाडीकर यांना अपघातात प्राण गमवावे लागले. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत
विरार ते डहाणूपर्यंतच्या केलेल्या सर्वेक्षणात विरार, पालघर, वैतरणा स्थानक....
अधिक वाचा