By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 14, 2019 02:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
दक्षिणी दिल्लीच्या ग्रेटर कैलाश पार्ट-टू भागात एका प्रसिद्ध खाजगी शाळेत सफाई कामगाराने प्री नर्सरीत शिकणार्या एका पाच वर्षाच्या मुलीवर दुष्कर्म केलं. घटनेनंतर त्याने मुलीला याबद्दल आई- वडिलांना सांगितल्यास वाईट घडेल अशी धमकी दिली. त्यामुळे मुलगी गप्प बसली.
नंतर तिच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखवले गेले तेव्हा तपासणीत दुष्कर्म झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मुलीला पोटदुखी आणि टॉयलेट जाताना त्रास होत असल्यामुळे आई- वडिलांना विचारपूस केली. तेव्हा मुलीने शाळेत तिच्यासोबत गैरवर्तन झाल्याचे तिने सांगितले.
पोलिसांनी शाळेचा सफाई कामगार पिचा मुत्थुला अटक केली आहे. तो काही दिवसांपासून मुलीची छेड काढत होता आणि संधी मिळाल्यावर त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे चौकशीत कळून आले.सीसीटीव्ही कॅमेर्यात आरोपी मुलीच्या मागे टॉयलेटमध्ये जाताना दिसत आहे.
जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटविल्यानंतर जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना भार....
अधिक वाचा