By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 05, 2020 03:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मिरारोड : काशी-मिरा परिसरात बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने पीडित महिलेवर ज्वलनशील द्रव्य पदार्थ अंगावर ओतून हल्ला केल्याची घटना घडली आहे. पीडित महिला बाजारातून साहित्य घेऊन घरी जात असतांना महिलेला आरोपीने काशीमीरा परिसरातील अदानी वीज कार्यालयासमोर गाठले. आरोपी आपल्या मित्राबरोबर दुचाकी घेऊन आला होता. त्या पीडित महिलेला आरोपीने विनयभंगचा गुन्हा मागे घेण्यास आणि स्टॅम्प पेपरवर लेखी स्वरुपात लिहून द्यावे अशी मागणी केली.
त्यावेळी दुचाकीस्वार असलेल्या एकाने तिच्या अंगावर हातातली ज्वालाग्रही द्रव्याने भरलेली बाटली फोडली. त्या बाटलीत पेट्रोल किवा डिझेल होते असा संशय व्यक्त होत आहे. ते पीडित महिलेवर पडले असता त्या महिलेने आरडा ओरडा केला. दोघे हल्लेखोर हाटकेशच्या दिशेने पळून गेले त्यामुळे डोळ्याची खूपच जळजळ होऊ लागल्याने स्थानिक लोकांनी तिला काशिमीरा पोलीस ठाण्यात नेले.
कशीमिरा पोलिसांनी महिलेला उपचारासाठी भाईंदरच्या भिमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. तो ज्वलनशील पदार्थ पेट्रोल अथवा डिझेल असू शकतो, असे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. आरोपी मूळ गुजरातमधील अहमदाबाद येथील असल्याचे कळताच एक पथक गुजरात दिशेने पाठविण्यात आले आणि त्या आरोपींना तेथून सोमवारी पकडून आणले. मंगळवारी आरोपीला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. काशी मिरा पोलिस विभागाचे अधिकारी अधिक तपास करीत आहे.
पुणे : पुणे स्टेशनलगत असलेल्या घोरपडी यार्डमध्ये साफसफाई करीत असता....
अधिक वाचा