ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सैन्यात आणि रेल्वेत नोकरी देण्याच्या नावावर फसवणूक, दिल्लीत हवाईदलाच्या माजी अधिकाऱ्याला अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 09, 2021 09:22 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सैन्यात आणि रेल्वेत नोकरी देण्याच्या नावावर फसवणूक, दिल्लीत हवाईदलाच्या माजी अधिकाऱ्याला अटक

शहर : देश

भारतीय हवाई दलाच्या एका माजी अधिकाऱ्याने सैन्यात आणि रेल्वे विभागात नोकरी देण्याच्या नावावर अनेक लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार दिल्लीत समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की आरोपी माजी हवाईदल अधिकारी आहे. त्याने आतापर्यंत अनेक लोकांची फसवणूक केली आहे. चक्रवीर चौधरी असं या आग्रा येथे राहणाऱ्या 35 वर्षीय आरोपीचं नाव आहे.

विशेष म्हणजे याआधी त्याला हवाई दलातूनही बडतर्फ करण्यात आलं होतं. 2015 मध्ये त्याच्याविरोधात एक गुन्हा देखील दाखल आहे. त्यानंतर तो फरार झाला होता. आरोपीविरुद्ध एक अजामिनपात्र वारंटही काढण्यात आलं होतं. मागील वर्षी पोलिसांनी त्याला गुन्हेगार म्हणून घोषित करण्याची कायदेशीर प्रक्रिया देखील सुरु केली होती.

पोलिसांनी सांगितलं, “चौधरी आणि त्याचा सहकारी थान सिंहने नोकरी देण्याचं आमिष दाखवत एक रॅकेटच सुरु केलं होतं. यात जवळपास 18 लोकांना फसवण्यात आलं. या सर्वांना आरोपींनी जवळपास 2.7 कोटी रुपयांना गंडा घातला आहे. थान सिंहला नोव्हेंबर 2019 मध्ये अटक करण्यात आलं होतं. मात्र, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

संयुक्त पोलीस आयुक्त ओ पी मिश्रा म्हणाले, “तपासात आरोपीने आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून विद्यार्थ्यांना हवाई दलात आणि रेल्वेत नोकरी देण्याचं आमिष दाखवलं आहे. याबाबत तक्रारी आल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची अनेक पथकं तयार करण्यात आली होती. चक्रवीर चौधरीला उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातून अटक करण्यात आलं. तो आपल्या वडिलोपार्जित गावी रिठोरा येथे राहत होता.” विशेष म्हणजे चौधरीची अन्य दोन प्रकरणांमध्ये देखील चौकशी सुरु आहे.

मागे

खारमधील तरुणीच्या हत्येमागे लव्ह ट्रँगलचा संशय, न्यू इयर पार्टीत ‘काय घडलं त्या रात्री?’
खारमधील तरुणीच्या हत्येमागे लव्ह ट्रँगलचा संशय, न्यू इयर पार्टीत ‘काय घडलं त्या रात्री?’

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या किशोरवयीन तरुणीच्या हत्याकांडाने ....

अधिक वाचा

पुढे  

भंडारा दुर्घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाची धावपळ, 2 वर्षांपासून फायर ऑडिट नाही!
भंडारा दुर्घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाची धावपळ, 2 वर्षांपासून फायर ऑडिट नाही!

भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. य....

Read more