By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2019 04:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
औषध निर्माण क्षेत्रातली नामांकित कंपनी असलेल्या Ranbaxy चे माजी प्रमोटर शिविंदर सिंह आणि रेलिगेयरचे माजी CMD सुनील गोधवानी यांना आज दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केलीय. या कारवाईने उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 740 कोटींच्या घोटाळा प्रकरणी या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तर अन्य एक आरोपी मलविंदर सिंह यांच्याविरुद्ध पोलिसांनी लुक आऊट नोटीस बजावलीय.
डिसेंबर 2018मध्ये ने दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंबंधात तक्रार दाखल केली होती. त्यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशी झाल्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केलं. सिंगापुर ट्रिब्युनलनेही यांना दोषी ठरवलं होतं.
शिविंदर सिंह आणि मलविंदर सिंह या दोन भावांवर दाइची सांक्यो या कंपनीचं 3 हजार 500 कोटींचं कर्ज आहे. ते परत नकेल्याने या कंपनीने सिंगापूर ट्रिब्युनलकडे तक्रार दाखल केली होती. या दोन भावांचा Ranbaxy ला जपानच्या औषध निर्माण कंपनीला विकाण्याचा डाव होता असाही त्यांच्यावर आरोप आहे. सेबीनेही यांना 403 कोटी जमा करण्याचा आदेश दिला होता.
फोर्टिस हेल्थेकयर आणि रेलिगेयर एंटरप्राइज लिमिटेड या कंपन्यांच्या संदर्भात या दोन भावांमध्ये भांडण सुरू होतं. त्यामुळे सेबीने या दोन कंपन्यांसह त्यांच्याशी संबंधीत 8 फर्म्सला 403 कोटी फोर्टिसच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले होते. या भावांनी भामटेगीरी करत फोर्टिसच्या खात्यातून हा फंड दुसरीकडे वळवला आणि पैशांच्या व्यवहारातही गैरव्यवहार केला त्यामुळे ही कारवाई करण्यात आलीय.
पंजाब अँड महाराष्ट्र बँकेतल्या भ्रष्टाचाराचे एकेक नवनवे प्रकार दररोज उघड....
अधिक वाचा