By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 20, 2020 11:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : nanded-Waghala
नांदेड - भारतासह संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत. देशभरात निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणीची चर्चा सुरू असताना, तसेच अशा अत्याचारांबाबत जनजागृतीही सुरू असताना नांदेडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचे उघड झाले आहे. बिलोली तालुक्यातील ४ शिक्षकांनी गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासला. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकारानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पीडितेची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात या चार नराधमांविरुद्ध पॉक्सो कायदा, तसेच कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थिनी साईबाबा विद्यालयात शिकते. हे विद्यालय नांदेड जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ५० किमीच्या अंतरावर आहे. या चार शिक्षकांनी सामूहिक बलात्कार करत असताना पीडित विद्यार्थीनीला अश्लिल व्हिडिओ देखील दाखवला.
दरम्यान, घडलेला सारा प्रकार या पीडितेने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर विद्यालय परिसरात खळबळ उडाली. या अत्याचारानंतर पीडितेला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला.
सय्यद रसुल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील, आणि घनंजय शेळके अशी या अत्याचार करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांना साथ देणारी महिला कर्मचारी सुरेखा बनसोडे हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर हे चारही शिक्षक आणि महिला कर्मचारी फरार झाले आहेत.
अजमेर जेलमधून पॅरोलवर सुटून आलेला कुख्यात गुंड डॉ. जलीस अन्सारी फरा....
अधिक वाचा