ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवला भूसुरुंगाचा स्फोट, 15 जवान शहीद झाल्याची भीती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 01, 2019 01:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवला भूसुरुंगाचा स्फोट, 15 जवान शहीद झाल्याची भीती

शहर : गडचिरोली

जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगाचा स्फोट झाला आहे. या स्फोटात 15 जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कुरखेड्यापासून 6 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. नक्षलवाद्यांच्या जाळपोळीनंतर बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने पोलीस पथक जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. सी-60 पथकाच्या जवान यात हल्ल्यात शहीद झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम)चे 15 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या हल्ल्यात खासगी वाहनाचा चालकही ठार झाला. कुरखेडा ते कोरची मार्गावर 6 किमी अंतरावर जांभुळखेडा गावाजवळ एका ठिकाणी हा स्फोट घडवून आणला, यात वाहनाच्या चिंधड्या उडाल्या. पहाटे वाहनांची जाळपोळ होण्याच्या घटनास्थळी एसडीपीओ शैलेश काळे गेले होते. तेथून त्यांनी या पथकाला तातडीने तिकडे पाचारण केले होते. पण पोलिसांचे वाहन उपलब्ध नसल्याने खासगी मालवाहू वाहनाने हे पथक निघाले होते.

                                                     

मागे

बारामतीतील शाळेच्या स्वच्छतागृहात विद्यार्थिनीवर बलात्कार
बारामतीतील शाळेच्या स्वच्छतागृहात विद्यार्थिनीवर बलात्कार

शहरातील एका माध्यमिक विद्यालयातील 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच ....

अधिक वाचा

पुढे  

पोलिसांची शोधमोहिम, २ महिला नक्षलवादी ठार
पोलिसांची शोधमोहिम, २ महिला नक्षलवादी ठार

भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या गुंडूरवाह....

Read more