ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गडचिरोलीत नक्षलींनी जाळली वाहने

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 03:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गडचिरोलीत नक्षलींनी जाळली वाहने

शहर : ahiwara

नक्षलींचा हिंसाचार सुरुच असून बुधवारी दुपारी नक्षलींनी एटापल्लीत तालुक्यातील कसनसूर येथे वाहने जाळली. कारका गावालगत नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील एक पाण्याचे टँकर व मिक्सर मशिनची जाळपोळ केली. पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत कारका गावालगत गेल्या काही दिवसापासून रस्त्याचे काम सुरु आहे. बुधवारी दुपारी सशस्त्र नक्षलवाद्यांनी मजूरांना काम बंद करण्याची धमकी देत दोन वाहनांना आग लावली. यात अमरावती येथील एका कंञाटदाराचे लाखो रुपयाचे याचे नुकसान झाले.
यापूर्वी नक्षलवाद्यांनी 1 मे रोजी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदाराच्या 36 वाहनांची जाळपोळ केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर सकाळी 11 वाजता कुरखेडा येथून शीघ्रकृती पथक घटनास्थळाच्या दिशेने निघाले असता जांभुळखेडा-लेंडारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. त्यात 15 जवान शहीद झाले. गेल्या वर्षी कसनासूर-बोरीयाच्या जंगलात पोलिसांनी 40 नक्षलवाद्यांना ठार केल्याचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जाते.

मागे

आंतरजातीय विवाहाच्या रागातून सासर्‍याने झाडल्या जावयावर गोळ्या
आंतरजातीय विवाहाच्या रागातून सासर्‍याने झाडल्या जावयावर गोळ्या

पिंपरीमधील गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. आंतरजातीय विवाहाच....

अधिक वाचा

पुढे  

भिवंडीतील वज्रेश्वरी देवी मंदिरावर दरोडा; 10 ते 12 लाखांची रोकड लंपास
भिवंडीतील वज्रेश्वरी देवी मंदिरावर दरोडा; 10 ते 12 लाखांची रोकड लंपास

भिवंडीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात शु....

Read more