By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2020 06:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : औरंगाबाद
मित्रासोबत फिरायला गेलेल्या 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना औरंगाबादच्या भांगसीमाता गड परिसरात समोर आली आहे. 4 ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात खळबळ माजील असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
औरंगाबाद शहरालगत असलेल्या भांगसीमाता गड परिसरात एक 21 वर्षीय तरुण आणि 19 वर्षीय तरुणी या भागात गप्पा मारत बसले होते. काही काळानंतर 3 तरुण त्या ठिकाणी आले आणि इथे का बसलात याचा जाब विचारत मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुलीला ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आजूबाजूच्या परिसरातील असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांची तीन पथके आरोपींचा शोध घेत आहेत.
सदरील प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून प्रत्येक महिलेच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची आहे. आणि या प्रकरणावर मी लक्ष ठेवून आहे असं म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी याच परिसरात अशाच प्रकारची घटना समोर आलेली होती. त्यामुळे मुलामुलींनी हे अशा निर्जन ठिकाणी फिरायला जाणं टाळलं पाहिजे.
सर्वोच्च न्यायालयात, फरार असलेल्या विजय मल्ल्याच्या फाईलमधून महत्त्वाची ....
अधिक वाचा