By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2020 11:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
हाथरस सामूहिक बलात्कारानंतर उत्तर प्रदेश सरकारवर दबाव वाढल्यानंतर आता गावात मीडियाला जाऊ दिले आहे. यावेळी पीडित कुटुंबांचा आक्रोश पाहायला मिळाला. आमच्यावर दबाव आणला जात आहे. माझ्या बहिणीवर दोनवेळा अत्याचार करण्यात आले आहेत. दुसऱ्यांना पोलिसांनी पेट्रोल टाकून जाळले. माझ्या बहिणी असा काय गुन्हा केला होता? तिला रात्रीच पेट्रोल टाकून जाळले. आम्ही हात जोडले, पाया पडलो. त्यांच्यापुढे लोटांगण घातले. मात्र, पोलिसांनी काही ऐकले नाही, आमच्या बहिणीवर त्यांनी दुसऱ्यांदा अत्याचार केले, असा थेट आरोप पीडितेच्या भावाने केला आहे.
अखेर हाथरस गावात मीडियाला प्रवेश देण्यात आला. त्यामुळे पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना मीडियाला भेट घेता आली. या कुटुंबाचं दु:ख पहिल्यांदाच जगाच्या समोर आले आहे. आमच्यावर अन्याय झाल्याची पीडित कुटुंबाने भावना व्यक्त केली आहे. आमच्यावर दबाववाढविण्यात येत आहे. ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली सांगत आहेत, तसे काहीही झालेले नाही. गावात कोणालाच प्रवेश नसताना भाजपचे दोन लोक गावात कसे आले, असा सवालही पीडितेच्या भावाने मीडियासमोर उपस्थित केला.
आम्ही कोणत्याही राजकीय दवाबाला बळी पडणार नाही. काँग्रेसकडून आम्हाला ५० लाख रुपयांची ऑफरही देण्यात आलेली नाही. माझ्या नातेवाईकांशी बोलणे झाले आहे. त्यांनी आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचा तो व्हिडिओ आहे. आम्हाला कोणीही कसलेली पैशाचे आमिष दाखविलेले नाही. आम्हाला न्याय मिळत नाही. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नसताना मोठी शिक्षा का देण्यात येत आहे. आम्हाला घरात पोलिसांनी कोंढून ठेवले. डीएमने आमच्यावर दबाव आणण्य़ाचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. केवळ मीडियाच्या माध्यमातून कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात कारवाई करण्यात आलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या भावाने व्यक्त केली.
उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथल्या बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असताना र....
अधिक वाचा