By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2020 08:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
हाथरस बलात्कार प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. पीडितेचा भाऊ आणि मुख्य आरोपी यांच्यामध्ये तब्बल 104 वेळा फोन कॉल झाल्याचे समोर आले आहे. पोलीस तपासात ही बाब उघड झाली असून, वारंवार फोन करण्याचे नेमके काय कारण असेल?, याचा शोध पोलीस घेत आहेत.
हाथरस बलात्कार प्रकरणामुळे उत्तर प्रदेश सरकारवर देशभरातून टीका होत आहे. दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून घटनेचा तपास सुरु आहे. अशातच बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप आणि पीडितेच्या भावात 104 वेळा फोन कॉल झाल्याचे समोर आले आहे.
मागील एका वर्षापासून फोन कॉल सुरु असल्याची माहिती
मुख्य आरोपी संदीप आणि पीडितेचा भाऊ यांच्यामध्ये मागील एका वर्षापासून फोन कॉल सुरु होते. 13 ऑक्टोबर 2019 पासून या दोघांमध्ये बोलणं सुरु झाल्याचे तपासातून समोर आले आहे. एकूम कॉलपैकी 62 कॉल पीडितेच्या भावाने स्व:तहून (आऊटगोईंग कॉल) केलेले आहेत. तर आरोपी संदीपने पीडितेच्या भावाला 42 वेळा फोन केला आहे. तसेच बहुतांश फोन कॉल चंदपा या परिसरातून असलेल्या फोन कॉल टॉवरवरुन जोडण्यात आले आहेत. चंदपा हा भाग पीडितेच्या गावापासून फक्त दोन किमी अंतरावर आहे. या सर्व फोन कॉलचे रेकॉर्ड्स पाहता, पीडता आणि मुख्य आरोपी संपर्कात असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
काय आहे हाथरस प्रकरण?
हाथरमध्ये 14 सप्टेंबरला 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. यानंतर तब्बल 2 आठवडे पीडित तरुणी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचार घेत होती. पण अखेर तिची आयुष्याची झुंज अपयशी ठरली. याचवेळी पोलीस प्रशासनाने रात्रीच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. ज्यानंतर उत्तर प्रदेश सरकारवर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या आदेशानुसार हाथरसच्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे.
उत्तर प्रदेशच्या हाथरस (Hathras News) इथं झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकर....
अधिक वाचा