ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हाथरस : अमानुष छळ आणि बलात्कार झालेल्या मुलीचा अंत

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2020 10:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30

हाथरस : अमानुष छळ आणि बलात्कार झालेल्या मुलीचा अंत

शहर : देश

उत्तर प्रदेशात हाथरस (Hathras gangrape) इथे अमानुष छळ आणि बलात्कार झालेल्या मुलीचा अंत झाला. उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या मृतदेहावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार  (Hathras gang rape Victim) करायला लावल्याचा आरोप या मुलीच्या पालकांनी केला आहे. मात्र या मुलीवर तिच्या नातेवाईकांच्या संमतीनेच अंत्यसंस्कार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

काल मध्यरात्री दिल्लीतून मोठ्या संरक्षणात मुलीचा मृतदेह आणि तिचे नातेवाईक सफदरजंग रूग्णालयातून निघाले. मृतदेह उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतला होता. विशेष म्हणजे नातेवाईकांच्या आधी पोलीस मृतदेह घेऊन गावात पोहोचले. त्यानंतर रात्री अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध केला आहे. तसेच सोशल मीडियावरून नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे. दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तरुणीने अखेरचा श्वास घेतला. यानंतर हॉस्पिटल बाहेर आंदोलन केले. नंतर कँडल मार्च काढण्यात आला. युपीत राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली गेली.

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर सवाल केला आहे. काँग्रेससह समाजवादी पार्टी, बसपा, आम आदमी पार्टी आणि भीम आर्मीसारख्या संघटना आणि पक्ष भाजप सरकारविरोधात आक्रम झाले आहेत. तर तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि तिची जीभ कापल्याचे आरोप वैद्यकीय अहवालाच्या आधारावर फेटाळून लावले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध केला आहे. तसंच पीडितेला जलद गती न्यायालयाद्वारे तातडीने न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मागे

सोलापुरात रेमेडेसिविरची हेराफेरी? माजी सैनिकाने जाब विचारताच 3 इंजेक्शन केले परत
सोलापुरात रेमेडेसिविरची हेराफेरी? माजी सैनिकाने जाब विचारताच 3 इंजेक्शन केले परत

कोरोनाशी लढताना आता जवळपास 6 महिने पूर्ण झाली आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची ....

अधिक वाचा

पुढे  

हाथरस अत्याचार : पंतप्रधान मोदी यांनी घेतली गंभीर दखल
हाथरस अत्याचार : पंतप्रधान मोदी यांनी घेतली गंभीर दखल

उत्तर प्रदेशमधील हाथरस पीडिता अत्याचार प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी ....

Read more