By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 01:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी विक्रम भावे याने केलेल्या जामिनाच्या अर्जावर २१ जानेवारीला निकाल दिला जाणार असून विशेषतः न्यायाधीश एस.आर.नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाबाबतची सुनावणी असल्याने जामिनावर दोन्ही बाजूकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे.
आरोपी विक्रम भावे याच्या जामिनावर काल गुरुवारी निकाल लागणार होता परंतु, न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी निकालाची तारीख पुढे ढकलली आहे. कारण, आई आजारी असल्याने पुढील तारखेला हजर राहता येणार नसल्याचे दाभोळकरांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर याच्या वतीने अॅड. समीर पटवर्धन यांच्याकडे विनती अर्ज केला असून तो न्यायालयाने मंजूरही केला आहे.
आरोपी शरद कळसकर याला किडनी स्टोनचा त्रास जाणवत असल्याने त्यावर उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे अशी विनंती बचाव पक्षाने न्यायालयात केली आहे. न्यायालयाने आरोपी कळसकर याला वैद्यकीय सेवा पुरवण्यात यावी असे आदेश कारागृह प्रशासनाला दिले आहे. आरोपी भावे याच्या अर्जावर २१ जानेवारीला निकाल लागल्यानंतर पुढील सुनावणी ३० जानेवारीला होईल असे न्यायालयाने सांगितले आहे.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज सुरक्षा दलाब....
अधिक वाचा