ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विरारमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन मुलींची सुखरुप सुटका

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 28, 2020 09:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30

विरारमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन मुलींची सुखरुप सुटका

शहर : मुंबई

विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी या हाय प्रोफाईल परिसरात राहत्या घरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिकता मानवी वाहतूक शाखेच्या पथकाने काल रात्री 8 च्या सुमारास ही कारवाही केली आहे.

या कारवाईद्वारे 3 मुलींची सुटका करण्यात आली असून एक महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ग्लोबल सिटी या परिसरात उच्यभ्रू लोकांची वस्ती आहे. या परिसरात मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील लोक भाड्याने घर घेऊन राहतात.

ग्लोबल सिरीट परिसरातील एका भाड्याच्या घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती नालासोपारा येथील अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली होती. पोलिसांनी सुरुवातीला एक बोगस गिऱ्हाईक पाठवून मिळालेल्या माहितीची आणि तिथल्या परिस्थितीची खातरजमा केली असता भाड्याच्या घरात वेश्या व्यवसाय करण्यासाठी 3 मुली आणल्या असल्याचे निदर्शनास आले.

पक्की माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ संबंधित घरावर धाड टाकून 3 मुली, वेश्या व्यवसाय चालवणारा एक पुरुष आणि एक महिला अशा 5 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही मुलींची सुटका केली. आरोपी महिला आणि पुरुषावर पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक

मुंबई पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी मुंबईच्या गोरेगावमध्ये (Goregaon) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देह व्यापाराचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका बॉलिवूड अभिनेत्रीसह 3 मुलींना अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम व्यापार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या टीमने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा पंचतारांकित हॉटेलमध्ये छापेमारी केली. यावेळी पोलीस ग्राहकांच्या वेशात गेले होते. जिथे त्यांना सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते डिलर्सलासुद्धा भेटले. सगळ्या गोष्टींचा अंदाज आल्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली. घटनास्थळावरून 3 महिलांची सुटका करण्यात आली आहे तर तिघांना अटक करण्यात आली आहे.

मागे

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांविरोधात कारवाईचा बडगा
पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांविरोधात कारवाईचा बडगा

नाशिकमध्ये पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांविरोधात कारवा....

अधिक वाचा

पुढे  

मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या
मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या

मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या करण्यात आली. ते संध्य....

Read more