ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोहम्मद शमीच्या पत्नीने केला राडा

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 04:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोहम्मद शमीच्या पत्नीने केला राडा

शहर : delhi

विश्वचषकासाठी निवड झालेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा पत्नी हसीन जहाँचे वादळ आले आहे. अमरोहा येथील शमीच्या घरी जाऊन हसीनने राडा केला. रविवारी रात्री हसनी जहाँ मुलगी आणि तिच्या आयासह शमीच्या घरी आली आणि तेथे वाद घातला. यानंतर पोलिसांनी शांतता भंगप्रकरणी हसीन जहाँला पोलिसांनी अटक केली.
हसीन जहाँने राडा घातल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला आणि तिच्यासोबत असणार्‍यांना ताब्यात घेण्यात आले व जिल्हा रुग्णालयातील एका प्रायव्हेट वॉर्डमध्ये नजरकैदमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी कलम 151 अन्वये अटक करून सर्वांना एसडीएम कोर्टात हजर करण्यात आले. येथे त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. जामिनानंतर हसीन जहाँ आपल्या गावी रवाना झाली.
याआधी हसीन जहाँने मोहम्मद शमीवर अनेक स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. शमी आणि त्याच्या नातेवाईकांमुळे शारीरिक आणि मानसिक हिंसेला सामोरं जावं लागलं असल्याचा आरोपही तिने केला होता. याखेरीज शमीने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोपही तिने केला होता. हसीनने शमीविरोधात पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी शमीची अनेकदा चौकशीही झाली. दरम्यानच्या प्रकारानंतर हसीन शमीच्या घरी देखील राहायला आली होती. परंतु सध्या ती माहेरी असून आता पुन्हा एकदा तिने सासरी येत राडा घातला आहे.

मागे

अभिजित देशमुखला गुन्हे शाखेया पथकाने ठोकल्या बेड्या
अभिजित देशमुखला गुन्हे शाखेया पथकाने ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेच्या पथकाने कोट्यवधी रुपये बुडवणार्‍या शेतकरी साखर कारखान्या....

अधिक वाचा

पुढे  

रोहित तिवारी हत्या प्रकरण : नवर्‍याचा खून करून व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करत होती माजी मुख्यमंत्र्याची सून
रोहित तिवारी हत्या प्रकरण : नवर्‍याचा खून करून व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करत होती माजी मुख्यमंत्र्याची सून

रोहितच्या हत्ये प्रकरणातील दिवसेंदिवस नवीन पुरावे समोर येत आहेत. रोहित तिव....

Read more