By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 01:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लखनऊ नाका भागात कमलेश तिवारी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. कमलेश तिवारी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यांचा मृत्यू झाला. यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली असून अशफाक आणि मोइनुद्दीन पठाण यांची नावे समोर आली आहेत. यांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी अडीच लाखाचे बक्षिस ठेवले आहे. हे संशयित शाहजहापूरमध्ये दिसले होते. यानंतर एसटीएफ यांनी हॉटेल आणि मदरशांच्या मुसाफिरखान्यात तात्काळ शोध मोहीम सुरु ठेवली आहे. हे संशयित सीसीटीव्हीमध्ये दिसले आहेत.
संशियत मारेकरी हे लखमीपूर जिल्ह्याच्या पलिया येथून येथून इनोव्हा गाडी बुक करुन शाहजहापूर येथे पोहोचले होते. शहाजहापूर येथे मिळालेल्या लोकेशनवरून त्यांच्या तपास सुरु झाला आहे. रेल्वे स्थानकाजवळील पॅराडाईस हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दोघे संशयित मारेकरी दिसले होते. एसटीएफने इनोव्हा गाडीच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. संशयित शाहजहापूर येथेच लपले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लखनऊत शुक्रवारी हिंदू समाज पार्टीच्या कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र कनेक्शन समोर आले. नागपुरातून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणात उत्तर प्रदेश एटीएसने गुजरातमधील सूरतमधून दोघांना अटक केली होती. सूरतमधून अटक झालेल्यांच्या माहितीवरून महाराष्ट्र एटीएसने नागपुरात एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. त्याचा या हत्या प्रकरणात सहभाग होता किंवा नाही, होता तर काय सहभाग होता हे चौकशी नंतरच स्पष्ट होणार आहे.
कमलेश तिवारी हत्याकांडाप्रकरणी २४ तासांच्या आत आरोपींपर्यंत पोहचल्याचा दावा पोलिसांनी केलाय. २३ वर्षीय रशीद पठाण मुख्य आरोपी असल्याचं उत्तरप्रदेश पोलीस म्हणतायत. उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी काल लखनऊत पत्रकार परि्षद घेतली. याप्रकरणी रशीद खान अहमद पठाण, मौलाना महोसिन शेख आणि फैजानला सुरतमधून अटक केलीय. पण सीसीटीव्हीत चित्रित झालेले आरोपी अजून अटकेत नाहीयेत.
अशिक्षित बोगस डॉक्टरा समवेत 5 बोगस डॉक्टरांना प्रकटीकरण शाखेच्या कक्ष 3 च्य....
अधिक वाचा