By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 10, 2020 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील तरुणीच्या भावाला सरकारी नोकरी देण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात येणार असून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणी कामही सुरू केल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील तरुणीची गेले ७ दिवस मृत्युशी चाललेली झुंज अपयशी ठरली. या प्रकरणामुळे राज्यात सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. रविवारी तिच्यावर चौथी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तिला वाचविण्याची डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केला. पण मध्यरात्रीपासून तिची प्रकृती अत्यंत खालावली आणि सकाळी ७ वाजता तिचा मृत्यू झाला.
३ फेब्रुवारीला आरोपी विकेश उर्फ विकी नगराळेने सकाळी ७ च्या सुमारास सदरहू शिक्षिका असलेल्या तरुणीचा पाठलाग करून हिंगणघाट शहरातील चौकात तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळले. यात ती तरुणी ४० टक्के भाजली होती. तिचा चेहरा, गळा आणि छाती भाजल्याने तिला श्वसनाचा त्रास होत होता. या तरुणीचा मृत्यू होताच गृहमंत्री देशमुख यांनी तिच्या भावाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. या घटनेतील आरोपी नगराळेला २० फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
,
चाळीस हजारांची लाच घेताना दोन जीएसटी अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आह....
अधिक वाचा