By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 05:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
नाशिक – नाशिक जिल्ह्यात हत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच शेतीकाम येत नाही म्हणून पतीकडून झालेल्या मारहाणीत विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना आढळून आली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरी तालुक्यातील धामणी गावात रमेश जाधव कुटुंबासमवेत राहतात. पत्नी सविता (३६) हिला शेतीचे काम येत नाही, या क्षुल्लक कारणावरून रमेश याचा पत्नीशी सातत्याने वाद होत असे. या वादावरूनच त्या दोघांमध्ये भांडणे झाली व त्यावेळी रमेशने सविताला जबर मारहाण केली. तिच्या छातीला मार बसल्याने गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, नाशिक येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना रात्री सविताचा मृत्यू झाला. या प्रकरणी सविताच्या माहेरच्या मंडळींनी संशयित रमेशविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस चौकशी करत आहेत.
पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये नराधम सावत्र बापाने आपल्या १५ वर्ष....
अधिक वाचा