ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

धक्कादायक! तृणमूल काँग्रेसला मत दिले नाही म्हणून पत्नीला पाजले अ‍ॅसिड

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 08:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

धक्कादायक! तृणमूल काँग्रेसला मत दिले नाही म्हणून पत्नीला पाजले अ‍ॅसिड

शहर : kolkata

पश्चिम बंगाल येथे मुर्शिदाबादमध्ये एका महिलेने तृणमूल  काँग्रेसला मत दिले नाही म्हणून तिच्या पतीने तिला अ‍ॅसिड पाजल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित महिलेचा पती हा  तृणमूलचा कार्यकर्ता असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
अंसूरा बीबी असे या महिलेचे नाव असून तिने तिसर्‍या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळी काँग्रेसला मतदान केले होते. त्यामुळे तिचा पती तिच्यावर प्रचंड रागावला होता. त्यानंतर पतीने व सासू सासर्‍यांनी तिला मारहाण केली व त्यानंतर तिच्या तोंडात अ‍ॅसिड ओतले. अ‍ॅसिडमुळे महिलेची जीभ व तोंडाच्या आतील भाग भाजला असून तिला मुर्शिदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंसूरा बीबीची प्रकृती गंभीर असून तिच्या मुलाने याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे.

मागे

सूरत बलात्कार प्रकरण : आसारामचा मुलगा नारायण साई दोषी
सूरत बलात्कार प्रकरण : आसारामचा मुलगा नारायण साई दोषी

सूरत बलात्कार प्रकरणी आसारामचा मुलगा नारायण साईला न्यायालयाने दोषी ठरवले ....

अधिक वाचा

पुढे  

कॅलिफोर्नियाच्या सिनेगॉगमध्ये गोळीबार,एका महिलेचा मृत्यू
कॅलिफोर्नियाच्या सिनेगॉगमध्ये गोळीबार,एका महिलेचा मृत्यू

कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो जवळ एका सिनेगॉगमध्ये गोळीबार झाल्याची घटना शनि....

Read more