ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरण: महिला डॉक्टरने शेवट्या क्षणी फोनवर सांगितलं की...., बहिणीचा खुलासा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2019 03:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरण: महिला डॉक्टरने शेवट्या क्षणी फोनवर सांगितलं की...., बहिणीचा खुलासा

शहर : देश

तेलंगनाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहित बलात्कार आणि हत्ये प्रकरणी देशभरात संताप उठला आहे. यात कसून सुरू असलेल्या पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर येत आहेत. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, सोमवारी शवविच्छेदनानंतर महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या अगोदर महिला डॉक्टरने शेवटच्या क्षणी तिच्या धाकट्या बहिणीशी फोनवर बोलणं केलं होतं. यात आता खळबळजनक माहिती समोर आली आहे.

महिला डॉक्टरांच्या धाकट्या बहिणीने घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, 'दीदीने रात्री 9.20 च्या सुमारास फोन केला होता आणि सांगितले होते की तिची गाडी पंचर झाली आहे. जे लोक तिची मदत करण्यासाठी पुढे आले होते, ते संशयास्पद वाटत आहेत. मी तिला फोन बंद करू नको आणि माझ्याशी बोलत रहा असं सांगितलं. पण, फोनची बॅटरी कमी असल्यामुळे आमचा संपर्क तुटला. त्यानंतर जे काही घडलं त्याने मी हादरले आहे. हे सगळं सांगताना बहिणीला रडू आवरलं नाही तर असा घाणरडं कृत्य कोणासोबतही होऊ नये असं तिनं म्हटलं आहे. पोलिसांनी तपासातून आरोपींविषयी गंभीर माहिती माध्यमांना दिली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी मोहम्मद आरिफ मागच्या दोन वर्षांपासून विना परवाना ट्रक चालवत होता. सगळ्यात खळबळजनक म्हणजे बलात्काराची ही घटना घडण्याच्या 2 दिवस आधी मोहम्मद आरिफला पोलिसांनी चेकिंग वेळी ताब्यात घेतलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्कारातील मुख्य आरोपी आरिफ एक ट्रक डायव्हर आहे. तो 26 वर्षांचा आहे. रिमांड रिपोर्टनुसार, आरिफला तेलंगाना रोड ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने 24 नोव्हेंबरला महबूब नगर परिसरात वाहन चेकिंहवेळी ताब्यात घेतलं होतं. आरिफकडे गाडी चालवण्याचे कोणतेही परवाने नव्हते. त्यानंतर हाच ट्रक महिला डॉक्टरचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी वापरण्यात आला.

2017पासून आरोपी आरिफ विना परवाना ट्रक चालवत होता. घटनेच्या दोन दिवस आधी आरिफच्या ट्रकमध्ये विटा भरल्या होत्या. हा ट्रक RTOच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटक आणि हैदराबादच्या मधे महबूबनगर परिसरात पकडला. पण त्यानंतर ट्रकला सोडून देण्यात आलं. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. जर हा ट्रक सोडलाच नसता आणि आरिफवर कारवाई केली असती तर बलात्काराची ही मन हेलावणारी घटना घडली नसती असं पोलिसांनी म्हटलं आहे.

परिवहन अधिकाऱ्यांना सुरुवातीला ट्रक ताब्यात घ्यायचा होता, परंतु नंतर आरिफने त्याच्या मालकाला श्रीनिवास रेड्डीला फोन केला. रेड्डीच्या सांगण्यावरून आरिफने ट्रकच्या इंजिनमधून तारा काढून टाकल्या. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, ट्रकमध्ये खराबी आहे. त्यामुळे ट्रक घेऊन जाणं अधिकाऱ्यांना शक्य झालं नाही म्हणून त्यांनी आरिफला जाऊन दिलं.

अधिकारी तेथून निघून गेल्यानंतर आरिफने ट्रकला महबूबनगरमधील पेट्रोल पंपावर नेले आणि तेथे त्याने सामूहिक बलात्कारात सामील झालेल्या आरोपी मित्र नवीन कुमार आणि चेन्ना केशवल्लू यांना बोलावलं. या सगळ्या माहितीवरून आता पोलिसांनी शमसाबाद येथे राहणाऱ्या ट्रक मालक रेड्डीविरूद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

 

मागे

गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा,कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा,कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

जर तुम्हाला कोणी सरकारी कर्ज कमी व्याजदरात मिळवून देण्याचे आमिष दाखवत असेल....

अधिक वाचा

पुढे  

तरुणीचा अर्धा जळालेला मृतदेह आढळला, बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय
तरुणीचा अर्धा जळालेला मृतदेह आढळला, बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय

जिल्ह्यात आज(मंगळवार) एका तरुणीचा अर्धा जळालेला मृतदेह आढळला. पोलिसांना सं....

Read more