ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हैदराबाद बलात्कार : आरोपीची आई म्हणाली, माझ्या मुलाला फाशी द्या किंवा जिवंत जाळा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2019 08:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हैदराबाद बलात्कार : आरोपीची आई म्हणाली, माझ्या मुलाला फाशी द्या किंवा जिवंत जाळा

शहर : देश

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरला सामूहिक बलात्कार करून जाळल्याच्या घटनेनंतर देशभरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या घटनेतील आरोपींना सार्वजनिक ठिकाणी शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, या आरोपींच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांच्या मुलांनी हे केलं असेल तर त्यांना लगेच फाशी द्या किंवा जिवंत जाळा.

सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी सी चेन्नाकेशावुलुची आई श्यामला यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलाताना सांगितलं की, माझ्या मुलालाही फाशीची शिक्षा द्या किंवा जाळा. जसं त्यांनी महिला डॉक्टरवर बलात्कार केल्यानंतर केलं तेच त्यांच्यासोबत करा. मलाही एक मुलगी आहे आणि मी त्या कुटुंबाच्या वेदना, दु:ख समजू शकते. मुलीच्या घरच्या लोकांवर आता काय परिस्थिती ओढावली असेल याची कल्पना करू शकते. जर मी माझ्या मुलाची बाजू घेण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यभर लोक माझ्यावर थुंकतील.

श्यामला यांनी सांगितलं की, गुरुवारी सकाळी जेव्हा पोलिसांनी मुलाला चौकशीसाठी नेलं तेव्हा पती या त्रासाने घरातून बाहेर गेले. चेन्नाकेशावुलुचं 5 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. त्याच्या पसंतीने लग्न लावून दिलं होतं. किडनीच्या विकाराने ग्रस्त आहे त्यामुळे कधीच त्याच्यावर दबाव टाकला नाही. दर सहा महिन्यांनी त्याला रुग्णालयात घेऊन जात होतो.

दरम्यान, न्यायालयाने चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लोकांमधील संताप आणि होत असलेले निदर्शने यामुळे आरोपींना न्यायालयात नेता आलं नाही. त्यामुळे आरोपींना पोलिस स्टेशनमधून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयसमोर हजर केलं गेलं.

मागे

हैदराबाद बलात्कार प्रकरणी टायर मेकॅनिकचा धडधडीत पुरावा, 48 तासांत आरोपींचा गेम ओव्हर
हैदराबाद बलात्कार प्रकरणी टायर मेकॅनिकचा धडधडीत पुरावा, 48 तासांत आरोपींचा गेम ओव्हर

तेलंगनातील हैदराबादमधील डॉक्टर महिला सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणी ....

अधिक वाचा

पुढे  

'हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या नाहीतर आत्महत्या करेन'
'हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या नाहीतर आत्महत्या करेन'

हैदराबाद (तेलंगणा) येथे महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कारानंतर जाळल्याप्रक....

Read more