By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 01, 2019 10:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कुर्ल्याच्या अस्वच्छ लिंबू सरबत वाल्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका अस्वच्छ इडलीवाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेर इडली वडा विकणाऱ्या फेरीवाल्याचा आहे. इडलीवाला इडली वड्याच्या चटणीत टाकण्यासाठी आणि ग्राहकांना पिण्यासाठी, हात धुण्यासाठी लागणारं पाणी चक्क शेजारील रेल्वे स्थानकाच्या जवळ असणाऱ्या शौचालयातून आणत आहे. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झालाय.
आत्तापर्यंत महापालिका किंवा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केलेली नसली तरी रेल्वे पोलीस या इडली स्टॉलवाल्याचा शोध घेत आहेत. बोरीवली स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवरील पार्किंगजवळ असलेल्या शौचालयाजवळची ही घटना असल्याचं बोरीवली जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितलं. यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
गो एअर या खाजगी विमान कंपनीत काम करणाऱ्या मंथन चव्हाण १९ वर्षीय तरुणाने आत्....
अधिक वाचा