By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 28, 2019 01:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : patna
लोकसभा निवडणुकीवेळी नक्षलवाद्यांनी पेरलेला आयईडी बॉम्ब आज कोब्रा जवान आणि झारखंड पोलिसांच्या तुकडीजवळ फुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या स्फोटामध्ये कोब्रा बटालियनचे 8 तर पोलिसांचे 3 जवान जखमी झाले आहेत. यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांवर कारवाई करण्याऱ्या पथकांवर बॉम्बहल्ले केले जात आहेत. गेल्या महिन्यात गडचिरोलीमध्येही असाच भूसुरुंग स्फोट घडवून जवानांचे वाहन उडवून देण्यात आले होते. अशाचप्रकारचा हल्ला आज पहाटे 4.53 च्या सुमारास झारखंडच्या कुचाई भागात करण्यात आला आहे.
झारखंडच्या सराईकेला येथे हा स्फोट झाला. पोलिस महासंचालक डी के पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आयईडी बॉम्ब निवडणूक प्रक्रिया उधळून लावण्यासाठी पेरण्यात आला होता. हा परिसर साफ करण्यासाठी कोब्रा जवान आणि पोलिसांची संयुक्त तुकडी काम करत होती. यावेळी या बॉम्बचा स्फोट झाला.
यामध्ये कोब्रा बटालियनचे 8 जवान आणि पोलिसांचे 3 जवान जखमी झाले आहेत. या सर्वांना सकाळी 6.52 मिनिटांनी रांचीमधील हॉस्पिटलमध्ये हेलिकॉप्टरद्वारे नेण्यात आले आहे. यापैकी तीन जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पांडे यांनी सांगितले.
हरियाणाच्या फरिदाबादमध्ये पोलिसांचा एक क्रूर चेहरा समोर आलाय. कर्तव्याला....
अधिक वाचा