By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 19, 2019 03:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात लोक प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. तर मुंबईसाठी महत्वाचे असलेलेल्या काळी-पिवळी टॅक्सींचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र अनेकदा हे मुजोर टॅक्सी चालकांकडून जवळचे भाडे असल्याने नाकारण्यात येते. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते. मात्र आता जवळचे भाडं नाकारणाऱ्या टॅक्सी चालकांना मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ)च्या कारवाई करणार आहे. मुंबईत जर जवळचं भाडे नाकारले तर या मुजोर टॅक्सीवाल्यांच्या विरोधात सर्वसामान्यांना तक्रार करता येणार आहे. यासाठी प्रवासी नागरिकांनी टॅक्सीचा नंबर किंवा त्याचा बिल्ला नंबर नोंदवून घेणे गरजेचे आहे. मुंबई आरटीओच्या 1800-220-110 या टोल फ्री क्रमांकावर फोन करत तक्रार दाखल करायाची आहे. या माहितीवरुन त्या टॅक्सी-रिक्षा चालकांची माहिती घेऊन आरटीओद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. नियम लागू केल्यानंतर वडाळाच्या आरटीओमध्ये रिक्षा – टॅक्सीच्या 999 तक्रारी दाखल झाल्या. या तक्रारांपैकी 485 तक्रारी वडाळा आरटीओ यांनी निकाली काढल्या आहेत. तसेच कारवाई करत असताना 495 लायसन्स रद्द केले आहेत. 999 तक्रारींमध्ये 708 रिक्षाचालक आणि 291 मीटर टॅक्सी यांचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही न घाबरता आता तक्रार करा आता हे मुजोर टॅक्सीं चालक जर तुमचे ऐकणार नाहीत तर त्यांच्यावर नक्की कारवाई होणार आहे.
देशात लोकसभा निवडणुकीसोबतच आयपीएलची जोरदार चलती पाहायला मिळत आहे. आयपीएलच....
अधिक वाचा