ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गोवंडीत जागेच्या वादातून गोवंडीत गोळीबार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 27, 2019 04:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गोवंडीत जागेच्या वादातून गोवंडीत गोळीबार

शहर : मुंबई

भरदिवसा आज पहाटे वाजताच्या सुमारास जागेच्या वादातून गोवंडी येथे बैंगण वाडी जंक्शन येथे अनोळखी सहा व्यक्तींनी मोटारसायकलवरून जात असताना तिघांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या गोळीबारीत अब्बास शेख(२५), जुबेर (२२) आणि अरमान (१८हे मोटारसायकलवरून जात असताना हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारीत अब्बाजच्या पायाला गोळी लागली असून मिर्झाही किरकोळ जखमी झाला आहे. या दोघांना उपचारासाठी पोलिसांनी शताब्दी रुग्णालयात दाखल केलं आहे. या प्रकरणी देवनार पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

त्याचप्रमाणे अन्य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. घाटकोपर मानखुर्द रोडच्या झाकीर हुसेन नगर परिसरातील लालूभाई कंपाऊडमध्ये सुलतान मिर्झा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. मिर्झाचे आरोपी राजन आणि जुनेदसोबत खालापूरच्या जमिनीवरून वाद सुरू होते. याच वादातून दोघांनी सुलतानचा काटा काढण्याचं ठरवलं. सोमवारी सुलतानच्या घरी तो त्याचे मित्र अरमान, जुबेर, अब्बास हे पहाटे च्या सुमारात जमले होते. त्यावेळी ऑटो रिक्षा आणि स्कूटीवरून आलेल्या राजन आणि जुनेदने मिर्झावर गोळीबार करत पळ काढलाया प्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा नोंदवून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे  आणि इतर फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती देवनार पोलिसांनी दिली.

मागे

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा - अशोक चव्हाण
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा - अशोक चव्हाण

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सर्....

अधिक वाचा

पुढे  

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपनिरीक्षकास मारहाण
युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपनिरीक्षकास मारहाण

तुळजापुरात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंझुर....

Read more