By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2020 12:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : वर्धा
वर्धा : वर्धामधील हिंगणघाट परिसराजवळच नंदेरी येथे आज सकाळी ७:३० च्या सुमारास एका महिला शिक्षिकेला भरचौकात अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याची घटना घडली आहे. शिक्षिकेला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, तिची परिस्थिति खूपच गंभीर असल्याचे समजले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे शिक्षिका महाविद्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडली असता सदर आरोपीने तिचा पाठलाग करून संधी साधत चौकामध्येच अडवून पीडित तरुणीवर पेट्रोल ओतून तिला पेटविले.
पीडिता तरुणीने आरडाओरड केल्याने आरोपी फरार झाला असून काही स्थानिकांनी त्या शिक्षिकेला रुग्णालयात दाखल केले. स्थानिकांच्या सांगण्यावरून आरोपी माथेफिरू असल्याचे समजले जात आहे. तसेच हिंगणघाट पोलीस निरीक्षक आरोपीचा तपास करीत आहेत.
श्रीनगर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पुलवामामध....
अधिक वाचा