By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 25, 2019 08:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई -हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणीअटक नीरजकुमार देसाईच्या पोलीस कोठडीत २८ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी पहिल्यांदा कोर्टाने २५ मार्च म्हणजे आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
हिमालय पूल चांगल्या स्थितीमध्ये असल्याचा बोगस अहवाल देणे स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अखेर भोवले. या दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी नीरजकुमार देसाईला १८ मार्च रोजी अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. सीएसएमटीला जोडणारा पादचारी पूल गुरुवार १४ मार्च रोजी रात्री ७.२० वाजण्याच्या सुमारास कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३६ जण जखमी झाले होते. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी स्ट्रक्चरल ऑडिटरने निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात हिमालय पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट डी. डी. देसाई असोसिएट कंपनीने गेल्या ऑगस्टमध्ये केले होते. त्या वेळी या कंपनीकडून छोट्या-मोठ्या दुरुस्तीचे काम करण्याचे सुचवून पुलाला सुरक्षित अवस्थेत असल्याचे प्रमाणपत्र दिले होते.
पुणे - बहिणीने प्रेमप्रकरणातून लग्न केल्याच्या रागातून भावाने तिच्या पतीच....
अधिक वाचा