ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बुरहान वाणीच्या गँगमधील लतिफ टायगरचा खात्मा

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 12:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बुरहान वाणीच्या गँगमधील लतिफ टायगरचा खात्मा

शहर : jammu

काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यामध्ये चकमक सुरू आहे. यावेळी लष्करानं 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरलं असून जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. शोपियनमधील अधकारा इमामसाहिबा या ठिकाणी सध्या ही चकमक सुरू आहे. चकमकीमध्ये भारतीय लष्करानं लतिफ टायगर या बड्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. कारण, जवानांनी घेरलेल्या दहशतवाद्यांमध्ये लतिफ टायगरचा देखील समावेश होता. यामध्ये लतिफ टायगरसह दोन दहशतवादी ठार झाले असून एक जवान जखमी झाला आहे.
जम्मू-काश्मीरच्या शोपिया भागात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळतेय. या एन्काऊन्टरमध्ये सेनेचा एक जवान गंभीर जखमी झाल्याचंही समजतंय. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षादलांनी या चकमकीत बुरहान वानी ग्रुपचा शेवटचा कमांडर लतीफ टायगरसहीत तारिक मौलवी यालाही ठार केलंय. परंतु, अद्याप याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही. लतिफ हा काश्मीरमधील दहशतवादी बुऱहाण वाणीच्या टोळीतील आहे. बुऱहाण वाणीचा खात्मा केल्यानंतर भारतीय लष्करानं बुऱहाण वाणी सोबत असलेल्या इतर दहशतवाद्यांचा देखील खात्मा केला.त्यापैकी लतिफ टायगर हा दहशतवादी बचावलेला होता. त्याचा आता खात्मा केल्याची माहिती समोर येत आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2005 साली हिजबुल मुजाहिद्दीन कमांडर बुरहान वानीसोबत दहशतवाद्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यातील एक तारिक पंडित याला 2016 मध्ये जिवंत पकडण्यात आलं होतं. लतीफ टायगरच्या खात्म्यासोबत सुरक्षादलांनी या सर्व दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवलंय.

मागे

गुजरातमध्ये नववधूला नवर्‍याने केली मारहाण
गुजरातमध्ये नववधूला नवर्‍याने केली मारहाण

लग्नाच्या पहिल्या रात्री शरीरिक संबंध करायला नकार दिला म्हणून नववधूला नवर....

अधिक वाचा

पुढे  

मंगरुळपीर तालुक्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
मंगरुळपीर तालुक्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ येथे 25 वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत....

Read more