By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 12, 2019 12:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jammu
दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) ने भारतात आपली शाखा उघडल्याचा दावा केला आहे. 10 मेला दहशतवादी आणि सैन्यामध्ये झालेल्या चकमकीनंतर इसिसने यासंदर्भातील घोषणा केली. इसिसची नवी शाखा 'विलायाह ऑफ हिंद' (अरबी नाव) दहशतवादी संघटन ठेवण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळले आहे.
इसिसच्या बोलण्यात काही तथ्य नाही पण त्यांचे बोलणे गांभीर्याने घ्यायला हवे असे इस्लामिक संघटनांवर लक्ष ठेवून असणाऱ्या एसआयटीई इंटेल ग्रुपच्या रिटा काट्ज यांनी म्हटले. इसिसने शाखेच्या भौगोलिक नियंत्रण विस्ताराबद्दल काही माहिती दिली नाही. पश्चिम आशियातील आपली जागा घालवल्यानंतर इसिस जागतिक स्तरावर आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे भारतात येणे हे त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो. याचा उल्लेख इसिस प्रमुख अबू बक्र अल-बगदादी याने केला होता.
काश्मीरच्या सोपिंया जिल्ह्यात हत्यारधारी इसिसचे दहशतवादी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे इसिसने टेलीग्राम अॅपवर सांगितले. या चकमकीत अनेक दहशतवादी मारले गेले तसेच गंभीर जखमी झाले. 10 मे ला आलेल्या मीडिया रिपोर्टमध्ये एक दहशतवादी मारला गेल्याचे सांगण्यात येत होते.
खुलताबाद घाटात अपघातात जखमी झालेल्या तरुणांची लोकांनी शूटिंग केले. मात्र त....
अधिक वाचा