ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जळगावात चौघांची कुऱ्हाडीने हत्या, शेतात मृतदेह सापडल्याने खळबळ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2020 11:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30

जळगावात चौघांची कुऱ्हाडीने हत्या, शेतात मृतदेह सापडल्याने खळबळ

शहर : जळगाव

जळगावमधून राज्याला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. रावेरमध्ये एकाचवेळी चौघांची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये 2 मुली आणि 2 मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेरच्या बोरखेडा रोडवरील शेतात ही घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारात गावतील काहींना शेतामध्ये चौघांचा मृतदेह आढळला. यानंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केलं. रावेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघांचीही कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. तर हे चौघेही अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून हत्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मुलं आणि दोन मुलींचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस स्थानिकांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

पुढे  

महाराष्ट्र हादरला! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला
महाराष्ट्र हादरला! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला

जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात महिला सुरक्षित नाही असं म्हणण्याची वेळ आता आल....

Read more