By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 30, 2019 06:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयसीसच्या केरळमधल्या कारवायांचा म्होरक्या रियास अबू बकरला ताब्यात घेण्यात आलं आहे. केरळमध्ये आत्मघाती हल्ला करण्याची त्याची तयारी सुरु होती. एनआयएनी ही मोठी कारवाई केली असून केरळमधून त्याला अटक करण्यात आली.
एनआयएनने केलेल्या चौकशीत अबू बकरने आणखी एका फरार आरोपी अब्दुल रशिद अब्दुल्लासोबत अनेक वर्ष ऑनलॉईन संपर्कात असल्याचं मान्य केलं आहे. त्यांची अन्य तरुणांना दहशतवादासंबंधी प्रवृत्त करणारी एक व्हिडिओ क्लीपही सोशल मीडियावर व्हायरल होत होती. रियास अबू बकरला आज कोची न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.पकडण्यात आलेला आरोपी आयसीसमध्ये सहभागी होण्यासाठी देश सोडून गेला होता. त्याच्याकडून अनेक मोबाईल फोन, सीम कार्ड, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, मल्याळम आणि अरबी भाषेतील डायरी, झाकीर नाईकच्या काही सीडी आणि पुस्तकं जप्त केली गेली आहेत.आरोपीकडून मिळालेल्या वस्तूंची फॉरेंसिक चौकशी होणार आहे. इतर ३ संशयितांची देखील चौकशी केली जाणार आहे. कासरगोडमधून २०१६ जुलैमध्ये १५ युवक गायब झाले आहेत.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवरायांचा अपमान करणाऱ्या अहमदनगर येथील नगरसेव....
अधिक वाचा