ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 02, 2021 07:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

शहर : मुंबई

एकीकडे संपूर्ण भारतात नववर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना, दुसरीकडे मुंबईत एक खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतील खार परिसरात हायप्रोफाईल सोसायटीत एका मुलीची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खार परिसरात भगवती हाईट्स नावाची इमारत आहे. या इमारतीच्या गच्चीवर काल नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत इमारतीतील काही रहिवाशी, तसेच त्यांचे जवळचे मित्र, नातेवाईक सहभागी झाले होते. या पार्टीत अनेकांनी दारु प्यायली होती.

पार्टी सुरु झाल्यानंतर ती मृत मुलगी गच्चीवर पोहोचली. त्यावेळी त्या ठिकाणी एक जोडपे आक्षेपार्ह स्थितीत तिथे बसले होते. त्या मृत मुलीने त्या जोडप्याला हटकत त्यांच्यावर आक्षेप घेतला. यावरुन या जोडप्याचा आणि त्या मुलीचा वाद सुरु झाला.

काही वेळाने हा वाद अगदी विकोपाला पोहोचला. त्या जोडप्याने त्या मुलीला जबर मारहाण केली. या मारहाणीदरम्यान तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी मृत मुलीला मारहाण करणाऱ्या त्या जोडप्याला अटक केली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर कलम 302, 34 अंतर्गत चौकशी केली आहे. तसेच पार्टीत उपस्थित असलेल्यांचीही कसून चौकशी केली जात आहे.

खारमधील भगवती हाईट्स या इमारतीच्या गच्चीवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान ही घटना घडली. त्यामुळे 31 डिसेंबरला गच्चीत कोणत्याही प्रकारची पार्टीची परवानगी नसतानाही पार्टी कशी काय आयोजित केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच याप्रकरणी आयोजकांवरीही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

मागे

नालासोपारा पोलीस हवालदार आत्महत्या प्रकरण, पोलीस निरीक्षकाची बदली
नालासोपारा पोलीस हवालदार आत्महत्या प्रकरण, पोलीस निरीक्षकाची बदली

तुळिंज पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सखाराम भोये यांच्या आत्महत्येप्रकरण....

अधिक वाचा

पुढे  

Pravin Raut | राऊतांच्या जवळच्या मानले गेलेल्या प्रवीण राऊतांची संपत्ती जप्त
Pravin Raut | राऊतांच्या जवळच्या मानले गेलेल्या प्रवीण राऊतांची संपत्ती जप्त

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईड....

Read more