By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 20, 2019 03:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
लांजा तालुक्यातील देवधे गावात एका माथेफिरूने ७ जणांवर प्राणघातक हल्ला केला, या सर्वांच्या माथेवर, हातावर आणि डोक्यावर घाव घातले. जखमींमध्ये एका पाच वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. हल्ल्यानंतर माथेफिरु थेट पोलिस ठाण्यात दाखल झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मात्र या माथेफिरूने ७ जणांवर प्राणघातक हल्ला का केला, याची पोलिस चौकशी करीत आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना पुढील उपचारांसाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे.
नाशिकमध्ये बँकेच्या ऑनलाईन व्यवहारात ग्राहकांची फसवणूक झाल्याचा धक्कादा....
अधिक वाचा