By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2019 04:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील हलकर्णी गावात सासू बसव्वा पाटील हिचा प्रियकरच्या मदतीने दांडक्याने डोक्यावर फटके मारून खून करणार्या निर्दयी सून मालश्री पाटील व तिचा प्रियकर रूपेश या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, मालश्रीचे रूपेशशी अनैतिक संबंध होते. याची माहिती बसव्वाला मिळाली होती. तसेच सासूने सुनेला एकदा रेड हँड पकडले होते. ही गोष्ट सासू सगळ्यांना सांगेल या भीतीने सून मालश्रीने प्रियकर रूपेशच्या मदतीने सासूच्या डोक्यावर दांडक्याने प्रहार केले. यात सासूचा मृत्यू झाला. पण पोलिसांना दरोड्याची गोष्ट रचून सांगण्यात आली. त्यामुळे पोलिसांना याबाबतीत वेगळाच संशय येत होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरवात करताच पोलिसांना मालश्रीच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. त्यावरून सासूचा खून केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी मालश्रीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत या दोघांनी खुनाची कबुली दिली आहे.
कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी संपती बाळगणार्या सार्वजनिक बांधकाम विभागात....
अधिक वाचा