ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महिला पोलीस उपनिरिक्षक विनयभंगप्रकरणी विद्यमानआमदाराला अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 29, 2019 10:27 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महिला पोलीस उपनिरिक्षक विनयभंगप्रकरणी विद्यमानआमदाराला अटक

शहर : मुंबई

भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलीस उपनिरिक्षकांच्या विनयभंगाप्रकरणी भंडारा पोलिसांनी अटक केली. १८ सप्टेंबरला विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. चौकशीअंती गुन्हे सिद्ध झाले आहेत. शनिवारी सकाळी त्यांना अटक केली.

मसर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार चरन वाघमारे यांना अटक केल्यानंतर तणाव निर्माण झाला असून पोलीस स्टेशनबाहेर कडक बंदोबस्त वाढविण्यात आला आहेतुमसर पोलीसस्टेशनमधील महिला पोलीस उपनिरीक्षक यांचा विनयभंग प्रकरणी त्यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरुन  कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना भंडारा पोलीस स्थेशनमध्ये अटक कऱण्यात आली आहे. या अटकेनंतर तणावाची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावलेला. तणावाची परिस्थिती दिसताच बंदोबस्त वाढवला. भाजप खासदारही पोलीस स्थानकात आले. याप्रकरणानंतर आता चरण वाघमारे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.

दरम्यान, गुन्हा नोंद झाल्याचे समजताच आमदार चरण वाघमारे तुमसर पोलीस स्टेशनमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले आणि मला अटक करा, अशी मागणी करत रात्रीच्या तीन वाजेपर्यंत पोलिस स्टेशनचा घेराव करून राहिले. त्यानंतर पाच दिवसांत चौकशी केल्यावर काय तो निर्णय घेऊ, असे पोलिसांनी सांगितल्यावर चरण वाघमारे आपल्या समर्थकांसह परत घालविले. सकाळी पोलिसांनी वाघमारे यांना त्यांच्या राहत्या घरून अटक केली.

भंडारा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणल्यानंतर त्यांच्या अटकेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आणि खुद्द खासदार भंडारा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. वाघमारे यांना अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयमध्ये नेण्यात आले आहे. त्यांच्या अटकेनंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

 

मागे

कोल्हापुरातील हलकर्णी गावात सुनेने केला सासूचा खून
कोल्हापुरातील हलकर्णी गावात सुनेने केला सासूचा खून

कोल्हापूर जिल्ह्यातील हलकर्णी गावात सासू बसव्वा पाटील हिचा प्रियकरच्या म....

अधिक वाचा

पुढे  

4 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करणार्‍या बापाला अटक
4 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करणार्‍या बापाला अटक

चुनाभट्टी भागात राहणार्‍या आशिर नावाच्या व्यक्तिला त्याने आपल्याच चार वर....

Read more