By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 07, 2019 01:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राकेश पवार हा एक स्थानिक क्रिकेटपटू होता. तो लहान मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायचा. त्याने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत क्रीडा वर्तुळात छाप पाडली होती. त्याचा भांडूपमधीलच काही लोकांसोबत वाद होता. हल्ला झाला तेव्हा राकेशची मैत्रीण त्याच्यासोबतच होती. ही महिला त्याची प्रेयसी असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय असून ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
मुंबईच्या भांडुप परिसरात गुरुवारी रात्री स्थानिक क्रिकेटपटू राकेश पवार याची अज्ञात व्यक्तींकडून धारदार शस्त्रांचे वार करून हत्या करण्यात आली. येथील महावीर पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार घडला. त्यानंतर तिघेही हल्लेखोर फरार असून भांडूप पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
राकेशवर हल्ला झाल्याची बातमी समजल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी राकेशला रुग्णालयात नेले, मात्र, तोपर्यंत राकेशचा मृत्यू झाला होता. राकेशच्या डोक्यावर धारदार शस्त्रांचे वार करण्यात आले होते. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दुबईत झालेल्या भीषण बस अपघातामध्ये आठ भारतीय व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. स....
अधिक वाचा