ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कसा रोखणार कोरोना! महिनाभरात कोट्यवधींचा गुटखा जप्त, वाहतुकीसाठी अनोख्या क्लुप्त्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 29, 2020 10:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कसा रोखणार कोरोना! महिनाभरात कोट्यवधींचा गुटखा जप्त, वाहतुकीसाठी अनोख्या क्लुप्त्या

शहर : देश

गुटखा बंदी झाली असतानाही राज्यात छुप्या पद्धतीने गुटक्याची विक्री सर्रास सुरू आहे. तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सरकारचे राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पोलिस आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे राज्यात विक्रीसाठी गुटखा सहज उपलब्ध होत आहे. सरकारकडून गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश असतानाही राज्यात गुटखा विकला जातोय. गेल्या महिनाभरात राज्यात काही कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केल्याची माहिती आहे.

लाखो रुपये किमतीच्या गुटख्यासह कंटेनर जप्त

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हट्टा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून टाकण्यात आलेल्या धाडीत एक कंटेनर लाखो रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असून अंदाजे 50 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान यामध्ये काही मोठ्या व्यक्तींची नावे समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सध्यातरी या प्रकरणी कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. कंटेनर चालक क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बीडमध्ये तीस लाख रुपयांचा गुटखा जप्त

एका ट्रकमध्ये गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती अंबाजोगाई शहर पोलिसांना मिळाली. शहरातील भगवान बाबा चौक परिसरामध्ये हा ट्रक थांबवला. यावेळी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. ट्रकमध्ये तीस लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. चालकाला ताब्यात घेत ट्रकसह 50 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हरबरा डाळीच्या पोत्यांखाली गुटखा लपवून वाहतूक

मुंबई - आग्रा महामार्गावरील हाडाखेड चेक नाक्याजवळ पोलिसांची वाहन तपासणी मोहीम सुरु असताना मध्यप्रदेशातून मुंबईकडे हरबरा डाळ घेऊन जात असलेल्या ट्रकची पोलिसांनी तपासणी केली असता डाळीच्या पोत्यांखाली गुटख्याने भरलेल्या 50 गोण्या आढळून आल्या. यात विमल गुटखा, सुगंधी गुटखा असा साठा आढळून आला. साधारण 32 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या या मुद्देमालासह ट्रक चालकासह अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मध्यप्रदेशातून गुटखा, बनावट दारूची महाराष्ट्रात होणाऱ्या वाहतुकीविरोधात कारवाई होत असते. मात्र मुळावरच घाव घालून अश्या अवैध धंद्यांची पायमुळं नष्ट करायला हवीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोरोनाला कसं रोखणार?

सध्या कोरोनाकाळात मास्क काढणे देखील महागात पडू शकते. अशात तोंडात गुटखा जमा झाल्याने गुटखा खाणाऱ्याला बोलताही येत नाही. मग ते मास्क काढतात आणि पिचकारी टाकून तोंड मोकळे करतात. अशाने घाण तर होतेच मात्र इतरांनाही धोका. त्यामुळे कसा रोखणार कोरोना हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पोलिसांचा सहभाग उघड

परराज्यातून येणाऱ्या गुटखा तस्करीमध्ये पोलिसांचा सहभाग उघड झाला असून पालघर पोलिस गुटखा माफिया समीकरणावर शिक्कामोर्तब झाला आहे. गुटखा माफियांशी संपर्कात राहिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि मनोर पोलिस ठाण्यातील एका हवालदाराला पोलीस महानिरीक्षक यांनी निलंबित केले आहे. गुटख्याची तस्करी करण्यासाठी महिन्याकाठी लाखो रूपयाची रक्कम घेतली जात असल्याबाबत मिरारोड येथील गुटखा माफियांने पोलिसांविरोधातच तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून दोन पोलिसांवर कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.   महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना देखील गुटख्याची खुलेआम विक्री केली जात असल्याचे अनेकदा उघड झाले होते. बंदी असताना गुटखा तस्करी फक्त पोलिसांच्या संगणमताने होत असल्याबाबत आरोप केला जात होता. मात्र आता गुटखा माफियांनेच पोलिसांविरोधात तक्रार दाखल केल्याने हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

गुजरातहुन तीन ट्रकमध्ये आलेला 65 लाखांचा गुटखा जप्त

महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू गुटखा विक्रीस प्रतिबंध असतानाही शेजारील गुजरात राज्यातून विविध मार्गे कोट्यवधी रुपयांचा गुटखा, पान मसाला महाराष्ट्रात विक्री केला जात असून अन्न सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने भिवंडी तालुक्यातील खारबाव येथे राजमार्गावर पाळत ठेवून तीन ट्रकमधून भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या तीन ट्रक मधील 280 गोण्यात असलेला 65 लाख 78 हजार रुपये किमतीचा विमल सुगंधित पान मसाला गुटखा जप्त केला. तीन ट्रक ताब्यात घेतले.अन्न सुरक्षा पथकाने मोहम्मद आदिल अबुजैद उदल यादव दोन ट्रक चालकांना ताब्यात घेतले असून अंधाराचा फायदा घेत एक चालक पसार झाला आहे. 36 लाख रुपयांचे तीन ट्रक ताब्यात घेतले आहेत.

मागे

डॉक्टरांचा निष्काळजीपणा! ऑपरेशन दरम्यान महिलेच्या पोटात राहिला टॉवेल
डॉक्टरांचा निष्काळजीपणा! ऑपरेशन दरम्यान महिलेच्या पोटात राहिला टॉवेल

का डॉक्टरच्या निष्काळजीपणा तरुणीच्या चक्क जीवावर बेतलं आहे. आरोप असा आहे क....

अधिक वाचा

पुढे  

'टोसिलीझुमॅब'चा काळाबाजार! 40 हजार रुपयांच्या इंजेक्शनची 70 हजारांत विक्री केल्याचे उघडकीस
'टोसिलीझुमॅब'चा काळाबाजार! 40 हजार रुपयांच्या इंजेक्शनची 70 हजारांत विक्री केल्याचे उघडकीस

 राज्यात तुटवडा असलेल्या करोना उपचारावरील 'टोसिलीझुमॅब' इंजेक्शनचा पा....

Read more