ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित! दिवसाला 105 मुली बेपत्ता, जबरदस्तीने ढकलले जाते वेश्याव्यवसायात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 20, 2020 10:22 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित! दिवसाला 105 मुली बेपत्ता, जबरदस्तीने ढकलले जाते वेश्याव्यवसायात

शहर : मुंबई

राष्ट्रीय गुन्हेगारी नोंद विभागाने (NCRB) 2019 मधल्या महिला अत्याचाराच्या घटनांचा धक्कादायक आकडा समोर आणला आहे. यानुसार, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवशी 105 महिलांच्या बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये सगळ्यात भयंकर बाब म्हणजे प्रत्येक दिवशी 17 महिलांची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय स्तरावर बेपत्ता महिला आणि तस्करीच्या सर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सगळ्यात अव्वल आहे. यानंतर मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालचा नंबर येतो. 2019 मध्ये तस्करीचा शिकार झालेल्या 989 घटनांमध्ये 88 टक्के महिला आणि 6 टक्के लहान मुलं होती. मजूरी, अवयव तस्करी, ड्रग पेडलिंग, लैंगिक शोषण, जबरदस्तीने लग्न करणं अशा इत्यादी कारणांसाठी मानवी तस्करी केली जात होती. महाराष्ट्राच्या बाबतीत, 95.6 तस्करीचं कारण जबरदस्ती वेश्याव्यवसायातून लैंगिक शोषण करणं हेच समोर आलं आहे.

या वर्षी 13 टक्के महिला बेपत्ता

या व्यतिरिक्त 2019 आणि 2018 च्या आकडेवारीच्या तुलनेत बेपत्ता महिलांच्या घटनांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2018 मध्ये सर्वाधिक बेपत्ता झालेल्या मुलांसह महाराष्ट्र पहिल्या 10 राज्यांच्या यादीत नव्हता. पण आता तब्बल 4,562 मुलं बेपत्ता झाल्यानंतर राज्य राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर पोहोचलं आहे. यातही मुलांच्या आकडेवारीनुसार, यामध्ये 55 मुली असल्याची माहिती देण्यात आली आहे. (

सेक्स ट्रॅफिकिंग एक मोठी समस्या

ज्या चमकत्या शहरांमध्ये राहण्याचं सगळ्यांना आकर्षण असतं अशा मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन महानगरांमध्ये रेड-लाइट क्षेत्राचं मोठं जाळं तयार होत आहे. राज्यात लैंगिक तस्करीची ही प्रमुख ठिकाणं बनली आहे. राज्यात या महानगरांना वगळता अनेक लहान शहरंदेखील सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये पुढे येत आहेत.

अपहरणाच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर

देशात अपहरण आणि अपहरणांच्या घटनांमध्ये ०.7 टक्क्यांची घट झाली असली तरी ही फार शुल्लक घट आहे. कारण, महाराष्ट्रात महिलांवरील गुन्हे मोठ्या प्रमाणात होत आहेत. उत्तर प्रदेशनंतर 2019 मध्ये महाराष्ट्रात अपहरणाची सर्वाधिक प्रकरणं समोर आली. मागच्या वर्षाच्या तुलनेत या घटनांमध्येही 1.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मागे

महाराष्ट्र हादरला! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला
महाराष्ट्र हादरला! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला

जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात महिला सुरक्षित नाही असं म्हणण्याची वेळ आता आल....

अधिक वाचा

पुढे  

पाणी पिण्याच्या बहाण्याने रिक्षा थांबवली, प्रवासी महिलेला बेशुद्ध करुन लुबाडलं,रिक्षाचालकाला बेड्या
पाणी पिण्याच्या बहाण्याने रिक्षा थांबवली, प्रवासी महिलेला बेशुद्ध करुन लुबाडलं,रिक्षाचालकाला बेड्या

रिक्षातून प्रवाशांना लुबाडणाऱ्या आरोपीला गोरेगाव पूर्वच्या आरे पोलिसांन....

Read more