ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मानवजातीची हद्द पार करणाऱ्या नराधमाला अटक; मातेलाच केली वासनेची शिकार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 01:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मानवजातीची हद्द पार करणाऱ्या नराधमाला अटक; मातेलाच केली वासनेची शिकार

शहर : औरंगाबाद

             औरंगाबाद - संपूर्ण मानवजातीला लाज वाटेल अशी अत्यंत वाईट घटना बुधवारी औरंगाबाद येथे घडली. दारूच्या आहारी गेलेल्या एका २० वर्षीय नरपशूने आपल्या जन्मदात्या आईलाच वासनेची शिकार केली. गेले तीन महीने तो हे दुष्कर्म करीत होता. कुणाला सांगितले तर मारून टाकण्याची आणि आत्महत्या करण्याची धमकीही त्याने आपल्या आईला दिली. अखेर असह्य झालेल्या हींन अत्याचारानंतर या पीडित मातेने औरंगाबाद सिडको पोलिस ठाण्यात येऊन या प्रकरणाची फिर्याद नोंदवली.

             सात वर्षांपूर्वी पतीचे निधन झालेल्या या मातेने चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नाेकरी करीत आपल्या चार अपत्यांना वाढवले. तीला दोन मुली आणि दोन मुले आहेत. यातील दाेन्ही मुली बाहेरगावी असतात. मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे तर दुसरी मुंबईत नोकरी करते. कामधंदा आणि शिक्षणही न करता दारूच्या आहारी गेलेला हा तरुण दीर्घकाळापासून दारूसाठी पैसे द्यावेत म्हणून आईला मारहाण करीत होता.

              गेल्या तीन महिन्यांपासून तर त्याने आपल्या आईलाच वासनेची शिकार केले आहे. पण भीती आणि आपलीच बदनामी होईल या चिंतेने ती तो अत्याचार सहन करीत आली. मंगळवारी दुपारीही त्याने घरात एकटी असलेल्या आईवर मारहाण करीत आणि धमक्या देत अत्याचार केले. त्यानंतर मात्र तिने हिंमत करत बुधवारी सकाळी आठ वाजता पोलिस ठाणे गाठले आणि आपल्या मुलावर कारवाई करावी यासाठी गुन्हा नोंदवला. सिडको पोलिसांनी या नरपशूला तातडीने अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याची आदेश दिला आहे.

मागे

हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी करणं अत्यावश्यक - सुप्रीम कोर्ट
हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी करणं अत्यावश्यक - सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली-  तेलंगणा पोलिसांनी घेतलेल्या हैदराबाद चकमकीप्रकरणी सुप्रीम ....

अधिक वाचा

पुढे  

१५ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करून सावत्र बाप फरार
१५ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करून सावत्र बाप फरार

        पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये नराधम सावत्र बापाने आपल्या १५ वर्ष....

Read more