By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 21, 2020 06:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : मुंबईमधील नेहरुनगर परिसरात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४ जणांना अटक केली असून, या चारही जणांची चौकशी पोलिस अधिकारी करीत आहेत. मुंबईतील नेहरू नगर भागातमध्ये एका महिलेवर सोमवारी रात्रीच्या सुमारास सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित महिला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नेहरु नगर भागात होती. ती पीडित महिला कुर्ला रेल्वे स्थानकावरुन उतरुन लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी पायी जात होती. त्यानंतर ती झुडपांमध्ये लघुशंकेसाठी गेली असता ४ जणांनी या महिलेवर बलात्कार केला.
महत्वाच्या वस्तु
पीडित महिलेचे २८ हजार रुपये आणि मंगळसूत्र खेचून घेऊन हे चौघे जात असल्यास त्यावेळी या पीडित महिलेने १०० या क्रमांकावर संपर्क केला असता पोलीस त्वरित पोहचले. पोलिसांनी लोकांच्या मदतीने ४ पैकी २ आरोपींना तातडीने अटक केली. आणि दोन फरार झाले. तर आज २१ जानेवारीला इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात १५ जानेवा....
अधिक वाचा