ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रुग्णालयाची ऑफर; २५०० रुपयांमध्ये मिळवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 06, 2020 06:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रुग्णालयाची ऑफर; २५०० रुपयांमध्ये मिळवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट

शहर : देश

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात उत्तर प्रदेशातील एका खासगी रुग्णालयाने २५०० रुपयात कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट देण्याची ऑफर सुरू केली आहे. रुग्णालयाच्या या ऑफरमुळे आरोग्य विभाग चिंतेत सापडलं आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या धक्कादायक बातमीनंतर मेरठमध्ये एकच खळबळ माजाली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रुग्णालयाकडून सांगितले जात आहे की, 'फक्त २ हजार ५०० रूपयांमध्ये कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल. रिपोर्टमध्ये सरकारी रुग्णालयाता शिक्का असेल. शिवाय हा रिपोर्ट १४ दिवसांसाठी वैध असणार आहे.' या रिपोर्टवर प्यारेलाल जिल्हा रुग्णालयाचा शिक्का आहे.

प्यारेलाल जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक पी के बन्सल यांनी याप्रकरणी कोणतीही माहिती रुग्णालयाकडे नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, संबंधित रुग्णालय प्रशासनाविरोधात एफआयआर दाखल करण्यता आला आहे. त्याबरोबर रुग्णालय बंद देखील करण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या या धक्कादायक ऑफरनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

याप्रकरणी मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजकुमार सैनी यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. शाह आलम यांच्या नावावर हे रुग्णालय आहे. आलम यांनी रुग्णालयावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. आपली आणि रुग्णालयाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. असं ते म्हणाले.

मेरठमध्ये १११६ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यपैकी २७५ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे ७७२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

 

मागे

वाढदिवसाच्या बहाण्याने घरी नेले, कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध, मुंबईत महिलेवर गँगरेप
वाढदिवसाच्या बहाण्याने घरी नेले, कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध, मुंबईत महिलेवर गँगरेप

44 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.....

अधिक वाचा

पुढे  

नवी मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये ४० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार
नवी मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये ४० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. क्वारंटाईन सेंटरमध्ये लैंगिक अत्याचारा....

Read more