By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 15, 2020 06:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यामध्ये त्यांचा वाहनचालक आणि सोबतच्या दोन कार्यकर्त्यांचाही समावेश होता. याप्रकरणी अमरावती न्यायालयाने ठाकूर यांना तीन महिने शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निकालावर अद्याप ठाकूर यांची प्रतिक्रिया आलेली नाही.
काय आहे प्रकरण?
महिला व बालकल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी अमरावती अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यामध्ये त्यांचा वाहनचालक आणि सोबतच्या दोन कार्यकर्त्यांचाही समावेश होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात गेलं होतं. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाले आहेत. याप्रकरणी यशोमती ठाकूर यांना 3 महिने शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्या कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्त्यांनाही न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. तर फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलीस कर्मचारी देखील शिक्षेस पात्र झाला आहे.
टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (TRP) यंत्रणेत फेरफार करुन फायदा मिळवल्याचा ठपका असल....
अधिक वाचा