ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग, आरोपी वॉर्डबॉयला अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2020 11:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग, आरोपी वॉर्डबॉयला अटक

शहर : पुणे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकिकडे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आणि संसर्ग झालेल्या रुग्णांना बरं करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे काही अपप्रवृत्तीही समोर येत आहेत. हडपसरमधील खासगी रुग्णालयात असाच एक धक्कादायक प्रकार घडला. या रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा रुग्णालयातील वॉर्डबॉयने विनयभंग केला. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.या प्रकरणी एका 35 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर हडपसर पोलिसांनी या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तसेच विनयभंगप्रकरणी आरोपी वॉर्डबॉयला अटक केली. आरोपीचं नाव अशोक नामदेव गवळी (वय 40, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी) असं आहे.दरम्यान, पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंनी शनिवारी 2 हजारांचा आकडा ओलांडला. शनिवारी (1 ऑगस्ट) दिवसभरात 5 मृत्यू झाले. जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या 2 हजार 35 वर पोहचली आहे. काल दिवसभरात 2 हजार 709 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली.

पुणे महापालिकेच्या 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग

पुणे महापालिकेच्या 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये 298 जण कायमस्वरुपी तर 76 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी विमा कंपन्यांकडून चालढकल होत असल्याचंही पाहायला मिळत आहे. मात्र, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत आणि पालिकेत नोकरीचं आश्वासन पाळलं जाईल, असा विश्वास महापौर मुरलीधर मोहळ यांनी व्यक्त केला आहे.

हलगर्जीपण करणाऱ्या 11 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेसोबतच पोलीस विभाग देखील सातत्याने कार्यरत आहे. मात्र, विभागातील काही पोलीस कर्मचारी हलगर्जीपणा करत असल्याचंही निदर्शनास आलं. यानंतर पोलीस आयुक्तांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या पुणे पोलीस दलातील 11 जणांवर कारवाई केली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते कॉन्स्टेबल अशा 11 जणांचा समावेश आहे.

या सर्वांवर वेतनवाढ रोखण्यापासून निलंबनापर्यंतची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास विलंब करणे, अनावश्यक गुन्हे दाखल करणे असे आरोप होते. यात ते दोषी आढळल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

मागे

माहिममधील खासगी रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द, बीएमसीची कारवाई
माहिममधील खासगी रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द, बीएमसीची कारवाई

माहिममधील फॅमिली केअर रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी जी उत्तर पालिकेन....

अधिक वाचा

पुढे  

‘नेटफ्लिक्स’च्या बनावट वेबसाईटपासून सावध रहा!
‘नेटफ्लिक्स’च्या बनावट वेबसाईटपासून सावध रहा!

नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट संदर्भात फसवणूक होण्याची शक्यता असून हे करणाऱ....

Read more