ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रस्ता चुकलेल्या तरुणीने मदत मागितली,आधी मदत, मग विनयभंग

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 17, 2019 11:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30

रस्ता चुकलेल्या तरुणीने मदत मागितली,आधी मदत, मग  विनयभंग

शहर : पुणे

रस्ता चुकलेल्या तरुणीने मदत मागितली. मात्र तिच्या वाट्याला आला विनयभंग. पुण्यातील कॅम्प परिसरात ही घटना घडली. त्याहून धक्कादायक म्हणजे, मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी भर रस्त्यात ही घटना घडली. मात्र, कोणीही या तरुणीच्या मदतीला पुढे आले नाही. पीडीत तरुणी कॅम्प परिसरात रस्ता चुकली होती. त्यातच तिच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली. तिनं तिथचे थांबलेल्या एकाची मदत मागितली. त्याने मदत केली. मात्र, त्याने तिचे चुंबन घेत विनयभंग केला.

 

रस्ता चुकलेल्या तरुणीने राम बद्रीलाल दाबोडीया याच्याकडे तिच्या मित्राशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल मागितला. बदोडीयाने फोन दिला. फोनवर बोलणे झाल्यानंतर जेव्हा या तरुणीने बदोडीयाला फोन परत दिला. तेव्हा तिला मोठा धक्काच बसला. बदोडीयाने या तरुणीचा हात धरला. हाताला किस केला. हाताचे चुंबन घेतले. आणि त्यानंतर तिच्या गालावर आपले ओढ ठेकवण्याचा प्रयत्न केला. याप्रकारानंतर ती तरुणी गोंधळून केली. कशबशी सुटका करुन तेथून रडत पळ काढला.

 दरम्यान, यावेळी या तरुणीच्या मदतीला कोणीही पुढे आले नाही. मात्र सीसीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली. आणि त्यामुळेच ही घटना पुढे आली. आरोपीची देखील ओळख पटली. राम बद्रीलाल दाबोडीया असे या आरोपीचे नाव आहे. तो ४३ वर्षांचा असून, तो वानवडी येथे राहतो. तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी या आरोपीला पोलिसांनी अटक केली.

 

मागे

मुंबईतील बारबालेचा नाद भागीदाराच्या जीवावर बेतला
मुंबईतील बारबालेचा नाद भागीदाराच्या जीवावर बेतला

बारबालेवर पैसे उडविण्यासाठी हवे असल्याने एका तरूणाने आपल्या बिझनेस पार्ट....

अधिक वाचा

पुढे  

शिक्षकाने वर्गात १२ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचे उघड,शिक्षक गजाआड
शिक्षकाने वर्गात १२ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचे उघड,शिक्षक गजाआड

पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाने वर्ग....

Read more