By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 15, 2020 01:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोविड सेंटरमध्ये एका तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा कोविड सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मानखुर्द येथील कोविड सेंटरमध्ये सॅनिटायझरचे काम करणाऱ्या तरुणाने तिथे उपचार घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर रात्रीच्या सुमारास विनयभंग केला. ही घटना पोलिसांना कळताच पोलिसांनी आरोपी दीपेश साळवे विरोधात गुन्हा नोंदवून अटक केली. हा आरोपी हा कॉन्ट्रॅक्टरने नियुक्त केलेला कर्मचारी असून पोस्को कायदा आणि विवीध कलमांच्या अंतर्गत त्याला अटक केली. दरम्यान, राज्यात कोविड सेंटरमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या बलात्कार आणि अत्याचाराविरोधात भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सरकार याकडे दुर्लक्ष का करतंय असा सवाल उपस्थित केला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोप....
अधिक वाचा